छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज बाधवांनी बिडकीन येथील पैठण - छत्रपती संभाजीनगर रोडवरील निलजगाव फाट्यावर रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी मंडळाधिकारी अरुण जोशी, सपोनि निलेश शेळके यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये बारामती येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित धनगर समाजबांधवांना संबोधित करताना माझा धनगर जमातीचा एस. टी. आरक्षणात समावेश करण्याबाबत फार अभ्यास आहे, माझ्याकडे पुष्कळ असे पुरावे आहेत. आमची सत्ता राज्यात, एकदा उपमुख्यमंत्री झाले. परंतू धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश झाला नाही. या रास्ता रोकोत बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे, गणेश काळे, गणेश दाणे, अंकुश धर्मे, रामेश्वर काकडे, योगेश दाणे, प्रकाश भालेकर, उत्तम धर्मे, अशोक भालेकर, सीताराम विर, रामनाथ पंडीत, कल्याण भालेकर, नश्नाव पंडीत, आबा वीर, भारत कोरडे, संतोष वीर, ऋतिक धर्म, निलेश गाढे, परमेश्वर काकडे, अमोल गाडे, बाळासाहेब धर्म, ऋषिकेश कानुले, ऋषिकेश वीर लक्ष्मण मंचारे, सोपान धर्मे, किसन तांबे, नाना धर्मे, अंबादास गुंजाळ, अंताराम धर्मे, कृष्णा पंडीत, देविदास धर्मे, हरीनारायण कोरडे, राजू धर्मे, किशोर धर्मे, राहुल भालेकर, बाबासाहेब धर्मे यांच्यासह हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला.